सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना इद्रिस मुलतानी यांचे निवेदन दिले.
मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन सिल्लोडसोयगाव मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदारसंघातील रस्ते विकास, प्रलंबित सार्वजनिक बांधकामे,
मूलभूत सुविधा तसेच आगामी विकास आराखड्यांसंदर्भात विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक कामांना गती देण्याची विनंती करण्यात आली.
सिल्लोड सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत निकृष्ट तारखेचे झाले असून ग्रामीण भागातून शहराकडे येण्यासाठी असलेले रस्ते सर्व सामान्यांसाठी खडतर ठरले आहेत. या रस्त्यांना उजाळा देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना भाजप संख्या प्रदेशाध्यक्ष मुलतानी यांनी भेट घेतली. तालुक्यातील सर्व रस्ते दुरुस्त करण्याची निवेदन देऊन मागणी केली. त्यावर मंत्री भोसले यांनी रोज आश्वासन देऊन लवकरात लवकर यावर अंमलबजावणी करण्याचे आश्वस्त केले. यावेळी भाजपा नेते सुरेश बनकर यांची उपस्थिती होती.












